भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥ मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥ न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कैसी वानूं त्याची थोरी । ज्याची चराचरीं जीवनकळा ॥१॥ अदिकरुनि ब्रम्हादिक । शेवटील कीटक धरुनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥ सकळही पर्वेव्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप । भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप । नंदे पाहिला निज नयनीं ॥१॥ मग याशोदेपाशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला । येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोठें ग्रामीं कोठें पुरीं । कोठें सागरीं तरियांत ॥१॥ कोठें सांदी कोंदी बिळीं । कोठें वारुळीं धुळीमाजी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥ कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें ॥१॥ वागउनियां कडिये खांदीं । निजात्मपदीं स्थापियलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा