भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

कंसा मली भय संचारू । झाला तेणें चिंतातूर । बैसोनियां करी विचारू । कृष्ण्‍वधार्थ् प्रयोग ॥१॥ तें ऐकोनी उत्पात वार्ता । गोकुळींचिया लोकों समस्ता । धैर्य नुपजेचि म्हणती आर्ता । जावें पळोनी दूरदेशा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कंसे बैसोनियां सभेसी । विडा मांडिला पैंजेसी । म्हणे जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुळा ॥१॥ त्यासी देईन हें अर्धराज्य । न करीं अन्यथा आपुली पैज । जया सांधेल हें काज । तेणें विलंब न करावा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कां जी कृपावंत झालेति निष्ठूर । नाईका उत्तर करुणेचें ॥१॥ काय अजामेळा होती पुण्यरासी । नेला वैकुंठासी नामोच्चारें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काय करावी तपसाधनें । हरिनाम चिंतनें सर्व सिध्दी ॥१॥ हा गे वाल्‍मीक रामचि झाला । प्रल्हादें जिंकीला व्दंव्दसमूह ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काय करुं वो भुलविलें भुलीं । चित्त माझें या विषयाचे चाली । आड कल्पना ठोकोनि राहिली । त्याणें संगती वो याची अंतरली वो ॥१॥ पायां पडतें वो दाखवा मज वाट कर्माकर्मा चुकूनियां घाट । कामक्रोधाचें ऐकोनि बोभाट । भय वाटे तें हें देखोनि दुर्घट वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार । हरिभक्त थोर भूमंडळीं ॥१॥ ज्याचिये भेटीचें आर्त ब्रम्हांदिकां । पूज्य सकळ लोकां विश्वा झालें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काय नेणों आचरण केलें । जया आलिंगिलें हदयेंसी ॥१॥ हें तों न कळे माझिये मती । याचिलागीं चित्ती व्याकुळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची ॥१॥ महिमा जाणें त्याचा तोचि । नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काली माजुम घेतला होता । गडियांसवें म्यां नेणतां । तेणेंचि आजि माझिया चित्ता । झाला विभ्रम ऐशापरी ॥१॥ न यें सोडाल आजि तरी । तुमचे घरीं न करीं चोरी । मस्तक ठेवितों पायांवरी । करा उपकार आजि मज ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कावडी भरुनि आणिलीं क्षीरें । दहीं घृत सारें नवनीतें ॥१॥ आदनाचेही पर्वत आले । माजि ते केले मिश्रित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कासियाचीं बिजें घडलीं । लावणी केली वृक्ष तृणा ॥१॥ नेणवें महिमा तुमचा देवा । देवा मानवा दानवासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा