भजनी मालिका
← भजनांकडे परत

काली माजुम घेतला होता । गडियांसवें म्यां नेणतां । तेणेंचि आजि माझिया चित्ता । झाला विभ्रम ऐशापरी

kali majum ghetala hota | gadiyansaven myan nenatan | tenenchi aji majhiya chitta | jhala vibhram aishapari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काली माजुम घेतला होता । गडियांसवें म्यां नेणतां । तेणेंचि आजि माझिया चित्ता । झाला विभ्रम ऐशापरी ॥१॥ न यें सोडाल आजि तरी । तुमचे घरीं न करीं चोरी । मस्तक ठेवितों पायांवरी । करा उपकार आजि मज ॥२॥ एकी म्हणती विश्वास नाहीं । याचिया शब्दाचा वो कांही । आजि सोडितां हा उदयांही । ऐसेंचि करील येउनी ॥३॥ अवघाचि चोरुनीया गोरस । नित्य खातो सावकाश । आमुचें घरीं नुरवी लेश । पहा माणसें रोडेलीं ॥४॥ आपुलिये हा सुटिकेसाठीं । उदंड सांगेल ऐशिया गोष्टी । परि निष्ठूर आणि कपटी । या ऐसा नाही भूमंडळीं ॥५॥ आतां यासि न्यावें तेथें । यशोदे दावावे निरुतें । तियेसि सत्य वाटत नव्हतं । फेडावा संदेह तियेचा ॥६॥ निळा म्हणे मग बांधोनी गळा । धुलकाविती अवघ्या बाळा ॥ गाळी वोपुनियां सकळां । आणिला धरुनी यशोदेपें ॥७॥