भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगकांति प्रकाशली । सूर्या दिधली किंचितसी

angakanti prakashali | surya didhali kinchitasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अंगकांति प्रकाशली । सूर्या दिधली किंचितसी ॥१॥ तेणेंचि प्रकाशला भानु । झाला तो नयनु त्रैलोक्या ॥२॥ तैसेंची चंद्रा जीवनमृत । दिधलें किंचित श्रीहरी ॥३॥ निळा म्हणे तेणेंचि जगें । निववित अंगें मयंकु ॥४॥