भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसा मली भय संचारू । झाला तेणें चिंतातूर । बैसोनियां करी विचारू । कृष्ण्‍वधार्थ् प्रयोग

kansa mali bhay sancharu | jhala tenen chintatur | baisoniyan kari vicharu | krushn‍vadharth prayog

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कंसा मली भय संचारू । झाला तेणें चिंतातूर । बैसोनियां करी विचारू । कृष्ण्‍वधार्थ् प्रयोग ॥१॥ तें ऐकोनी उत्पात वार्ता । गोकुळींचिया लोकों समस्ता । धैर्य नुपजेचि म्हणती आर्ता । जावें पळोनी दूरदेशा ॥२॥ तंव नंद म्हणे ऐका मात । जावोनी वसो दरकुटी आत । साडुनिया जाता आपुला प्रांण । घरे दारे नुरतील ॥३॥ विचार मानला सकळांसी । गेली पळोनी दरकुटीयेसी । गांवी नाही मुंगी माशी । ऐसे ओस पडियले ॥४॥ उष्णा वारियांचे आघात । साउली न मिळेचि त्या वनांत । तंव देखिल्या अकस्मात । माईक गाडा श्‍कटासूर ॥५॥ यशोदा देखेनियां ते वेळी बाळकृष्ण निजवी गाडियातळीं तंव हा लाघवी वनमाळी । पद घातेंचि उडविला ॥६॥ तेणें तो आक्रंदला । घोष्‍ दणणिला । जाउनी मथुरेमाजि पडिला । कंस म्हणेरे शकटहि गाढा । आजि लाविला मृत्यूपंथे ॥८॥ निळा म्हणे गौळिये म्हणती । गाडा उडाला कैसिया रीती । तळीं होता हा श्रीपती । थेर भाग्यें वांचला ॥९॥