कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीवविहीन
kanhin kari na ha karavi | asoni jivin jivavihin
कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीवविहीन ॥१॥ संतचि ओळखती यासी । जाणतां आणिकांसी दुर्लभ ॥२॥
kanhin kari na ha karavi | asoni jivin jivavihin
कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीवविहीन ॥१॥ संतचि ओळखती यासी । जाणतां आणिकांसी दुर्लभ ॥२॥
kanhi karya mandel jevhan | majachi pragat honen tevhan
कांही कार्य मांडेल जेव्हां । मजचि प्रगट होणें तेव्हां ॥१॥ जवळिच आहे भेऊं नका । माझिया बळें दुर्जन लोकां ॥२॥
kanhi chamatkar dekhati | vishvasen tari vate priti
कांही चमत्कार देखती । विश्वासें तरी वाटे प्रीति ॥१॥ ऐसा विपरीत आहे भोळा । जाणा येथींचा जी गोपाळा ॥२॥
kanhin manadambhasathin | nahin keli myan he ati
कांहीं मानदंभासाठीं । नाहीं केली म्यां हे अटी ॥१॥ तुम्ही तों जाणतां अंतर । काय तेथें परिहार ॥२॥
kanhich janiv na karavi | ahe jivin hen thaven
कांहीच जाणीव न करावी । आहे जिवीं हें ठावें ॥१॥ परि मज बोलवी देवो । तेथें उपावो कोणाचा ॥२॥
kanhinch na houni vistarala | bahurupi ha ekala
कांहींच न होऊनि विस्तारला । बहुरुपी हा एकला ॥१॥ नवल विचित्र हेंचि वाटे । कैसा नेटोनि ठेला नटें ॥२॥
kanhinch nahoniyan kanhin ek hota | namarupatit apan nenata | honyanahonyachya nenoniyan varta | tyacha sankalpachi jhala tya prasavata vo
कांहींच नहोनियां कांहीं एक होता । नामारुपातीत आपण नेणता । होण्यानहोण्याच्या नेणोनियां वार्ता । त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥१॥ ऐशा परि हा मूर्तिमंत झाला । विश्वीं विश्वकार होऊनियां ठेला । भाग्यें आमुचिया मूर्ती मुसावला । गाऊ वानूं ऐसा आम्हांसी फावला वो ॥२॥
kanhichi sadaiv dubale | na mhane ha balen narinar
कांहीचि सदैव दुबळे । न म्हणे हा बाळें नारीनर ॥१॥ जया परी तैसा होय । बापमाय सकळांचा ॥२॥
kinchit sukh agalen du:kha | pavati avashyak vyabhichari
किंचीत सुख आगळें दु:ख । पावती अवश्यक व्यभिचारी ॥१॥ क्षयो व्याधी भगें पडतीं । जगनिंदय होती हे आधीं ॥२॥
kiti tari chinta karun | dhir dharun kothavari
किती तरी चिंता करुं । धीर धरुं कोठवरी ॥१॥ आला दिवस बुडोनी जातो । अतिशयचि राहतो केला तो ॥२॥
kirtanacha ghosh gajar | aikatan apar udhdarale
किर्तनाचा घोष गजर । ऐकतां अपार उध्दरले ॥१॥ ऐसे किती सांगावे ते । कीतनें सरते वैकुंठी ॥२॥
kirtan kelen bramhanande | dhruv pralhaden ekanishtha
कीर्तन केलें ब्रम्हानंदे । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥१॥ तयां केलें सुखसंपन्न । त्रैलाक्यीं मान वाढवुनी ॥२॥
kirtanaragen je je | te te sahajen haripriy
कीर्तनरगें जे जे । ते ते सहजें हरिप्रीय ॥१॥ येर मुमुक्ष्रू जे जे होती । कीर्तनें पावती ते लाभा ॥२॥
kirtanachi avadi motha | dhanve pathin veshnava
कीर्तनाची आवडी मोठा । धांवे पाठीं वेष्णवा ॥१॥ जेथें होती नामघोष । नाचें उदास ते ठायां ॥२॥
kirtanen dhuvat kelen lokan | dosh kalankapasuni
कीर्तनें धुवट केलें लोकां । दोष कळंकापासुनी ॥१॥ टाळिया हरिनामाच्या घोषें । पळती त्रासे कलिमल ॥२॥
kirti aikoni alon dara | majha kara sambhal
कीर्ति ऐकोनि आलों दारा । माझा करा सांभाळ ॥१॥ जतन करीन तुमचें नाम । धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥
kuvalai marduniyan unmatta | upatuniyan ghetale tyanche dant | baliram ani krushnanath | ananden nachat ranasaure
कुवळई मर्दूनियां उन्मत्त । उपटूनियां घेतले त्यांचे दांत । बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे ॥१॥ दोघेहि बंधु अति सुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । हे देखोनियां महावीर । मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥
krupa karuni majhi mati | vadhati keli tumhin priti
कृपा करुनि माझी मती । वाढती केली तुम्हीं प्रीति ॥१॥ तरी पाववा जी पार । केलिये कथेचा विस्तार ॥२॥
krupa keli santajanin | artha davile ughaduni
कृपा केली संतजनीं । अर्थ दाविले उघडुनि ॥१॥ तेचि प्रगट केलें आतां । नाहीं बोलिलों मी स्वतां ॥२॥
krupa keli santajanin | lavilon bhajanin shriharichya
कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरीच्या ॥१॥ नाहीं तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौर्यांयशीं ॥२॥