भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांही कार्य मांडेल जेव्हां । मजचि प्रगट होणें तेव्हां

kanhi karya mandel jevhan | majachi pragat honen tevhan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कांही कार्य मांडेल जेव्हां । मजचि प्रगट होणें तेव्हां ॥१॥ जवळिच आहे भेऊं नका । माझिया बळें दुर्जन लोकां ॥२॥ तुम्हां गांजिती व्देषिती । त्यांची समूळ विनशति ॥३॥ निळा म्हणे भगवदवाणी । ऐसी प्रविष्ट झाली श्रवणीं ॥४॥