भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहींच न होऊनि विस्तारला । बहुरुपी हा एकला

kanhinch na houni vistarala | bahurupi ha ekala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कांहींच न होऊनि विस्तारला । बहुरुपी हा एकला ॥१॥ नवल विचित्र हेंचि वाटे । कैसा नेटोनि ठेला नटें ॥२॥ एका ऐसा न होऊनि एक । नानाकोंरे हा अनेक ॥३॥ निळा म्हणे नट लाघवी । शेखीं वेगळा गोसावी ॥४॥