भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहींच नहोनियां कांहीं एक होता । नामारुपातीत आपण नेणता । होण्यानहोण्याच्या नेणोनियां वार्ता । त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो

kanhinch nahoniyan kanhin ek hota | namarupatit apan nenata | honyanahonyachya nenoniyan varta | tyacha sankalpachi jhala tya prasavata vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कांहींच नहोनियां कांहीं एक होता । नामारुपातीत आपण नेणता । होण्यानहोण्याच्या नेणोनियां वार्ता । त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥१॥ ऐशा परि हा मूर्तिमंत झाला । विश्वीं विश्वकार होऊनियां ठेला । भाग्यें आमुचिया मूर्ती मुसावला । गाऊ वानूं ऐसा आम्हांसी फावला वो ॥२॥ नव्हे ते पुरुष ना नारीपण जेथें । शुन्या निरशून्याहि पैलाडी परते । नाकळे नाद बिंदू कळा ना ज्योतितें । परा पश्यंतीचा प्रवेश नाहीं जेथें वो ॥३॥ गुणलावण्याची उघडली खाणी । मंडित चतुर्भुज मुगुट माळा मणी । मुख मनोहर कुंडलें श्रवणीं । श्रीवत्सलांछन ह्रदयीं साजणी वो ॥४॥ घ्या गे उचलूनि जाऊं निजघरा । आजि फावला तो पाहों यदुवीरा । खेळों आदरें या खेळवूं सुंदरा । याच्यासंगे नाहीं सुखा पारावरा वो ॥५॥ निळा म्हणे ऐशा संवादे सुंदरी । करिती क्रिडा सवें घेऊनि मुरारी । सुखी सुखरुप झाल्या कल्पवरी । पुन्हा न येती त्या फिरोनि संसारीं वो ॥६॥