हरीचिया भजनें हरिचे जन । करिती पावन पतितांसी
harichiya bhajanen hariche jan | kariti pavan patitansi
हरीचिया भजनें हरिचे जन । करिती पावन पतितांसी ॥१॥ ऐसा त्यांचा अगाध महिमा । निरुपमा तो न वर्णवे ॥२॥
harichiya bhajanen hariche jan | kariti pavan patitansi
हरीचिया भजनें हरिचे जन । करिती पावन पतितांसी ॥१॥ ऐसा त्यांचा अगाध महिमा । निरुपमा तो न वर्णवे ॥२॥
harichi katha amrutaras | god gras namavali
हरीची कथा अमृतरस । गोड ग्रास नामावळी ॥१॥ तेणें करुं सर्वदा तृप्ती । क्षुघे निवृत्ती तृषेची ॥२॥
harichen namachi ek pure | sakal sadhanachiye dhuren
हरीचें नामचि एक पुरे । सकळ साधनाचिये धुरें ॥१॥ पावावया वैकुंठासी । लहानथोरां विश्वासीयांसी ॥२॥
harichen manohar kirtan | henchi sadhan kaliyugin
हरीचें मनोहर कीर्तन । हेंचि साधन कलियुगीं ॥१॥ नको आणिकां मतांतरी । पडो भवसागरीं वहावसी ॥२॥
harichya namen hariche das jale sakalikans vanday jagin
हरीच्या नामें हरीचे दास जाले सकळिकांस वंदय जगीं ॥१॥ समोर त्याच्या नये काळ । कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥
harichya padhoniyan namavali | kariti holi mahadosha
हरीच्या पढोनियां नामावळी । करिती होळी महादोषा ॥१॥ तेचि धन्य देहधारी । या माझारीं कलियुगा ॥२॥
harichya payin vishvasalen | savangade jhale mhanauni
हरीच्या पायीं विश्वासलें । सवंगडे झाले म्हणउनी ॥१॥ दिवस रातीं नव्हतां तुटी । सांगती गोठी आलोकिका ॥२॥
harichya bhajanen hariche bhakta hariche bhakta | jhale vikhyat bhumandalin
हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥ तरोनि आपण तारिले आणिका । वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥
harivin ahe kon | san mothen vegalen
हरीविण आहे कोण । सान मोठें वेगळें ॥१॥ सर्वांचाही सर्व साक्षी । अध्यक्षी हें नाम त्या ॥२॥
haruniyan ghyaven chitta | avaghenchi vitta dhan majhen
हरुनियां घ्यावें चित्त । आवघेंचि वित्त धन माझें ॥१॥ हें तों नव्हे उचित तुम्हां । पुरुषेत्तमा विचारा ॥२॥
ha ge paha vite ubha | sachchidanadancha ha gabha
हा गे पहा विटे उभा । सच्चिदानदांचा हा गाभा ॥१॥ देखे सकळांचेही भाव । अध्यक्ष हें याचें नांव ॥२॥
ha ton tumacha sahaj gun | karaven palan dasachen
हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें ॥१॥ नेणपणें म्यां विनविलें । पाहिजे क्षमा केलें तें ॥२॥
hakesaven udi | ghaluniyan stambh phodi
हाकेसवें उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥२॥
hachi upav sugam sar | taranen sansar jaya nara
हाचि उपाव सुगम सार । तरणें संसार जया नरा ॥१॥ नाम गातां गोविंदाचे । फिटे जीवाचें जीवपण ॥२॥
hat pay indriyen miloni mela | chala mhanati pahon dola
हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळा ॥१॥ देखणेंचि नव्हती देखती काये । अवघीयाचा देखणा डोळाचि आहे ॥२॥
hatin ghetala chitank | dithi na diesenchi kanak
हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक ॥१॥ तैसा देव पाहों जातां । विश्वाभासुचि भोंवतां ॥२॥
hatin chakra sudarshan | vagavitan na manin tyacha shin | apulya bhaktanche rakshan | ani nirdalan arivarga
हातीं चक्र सुदर्शन । वागवितां न मनीं त्याचा शीण । आपुल्या भक्तांचे रक्षण । आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥ भक्तस्तवनीं ठेविेले कान । भक्तांपाशीं जीवप्राण । भक्तांकडे लाविलें मन । कोणीं गांजिलें यासाठीं ॥२॥
hindavitan desh | naye tuti jya labhas
हिंडवितां देश । नये तुटी ज्या लाभास ॥१॥ चाले सर्व घेणेंदेणें । कोठें कांहीं न पडे उणें ॥२॥
hishobi hishob avaghachi milala | surya uday jhala antaradrushti
हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला । सूर्य उदय झाला अंतरदृष्टी ॥१॥ देऊनियां गांठ लाविलें कपाट । साधिलें अचाट गुरुसेवा ॥२॥
he dekhoniyan goval | ale dhavoniyan sakal | krushnasi mhanati yudhda tumbal | kelen tuvan vrushabhensi
हे देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥ आम्ही देखिलें दुरोनी । होतो डोंगरीं बसोनी । तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥