सर्वस्वें उदार । देतां न म्हणे साने थोर
sarvasven udar | detan na mhane sane thor
सर्वस्वें उदार । देतां न म्हणे साने थोर ॥१॥ तें हें पंढरीये धेंडें । उभें पुंडलिकापुढें ॥२॥
sarvasven udar | detan na mhane sane thor
सर्वस्वें उदार । देतां न म्हणे साने थोर ॥१॥ तें हें पंढरीये धेंडें । उभें पुंडलिकापुढें ॥२॥
sarvantarin vas yacha | mahadadi anucha hadayastha
सर्वांतरीं वास याचा । महदादी अणूचा हदयस्थ ॥१॥ नाहीं दुरी जवळी ऐसा । कोंडोनी दिशा भरलासे ॥२॥
sarvammaji gagan ahe | pari dharitanchi naye kay karun
सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥ तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥
sarvi asatan sarvapanen | mi hen mhane avidaya gunen
सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥ पाहातां आधीं अविदयाचि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥
sanvartak varshel jaladharin | tuvanhi jhagataven tanv tyavari aisen sangoniyan prerile vari | panchahijan atikrodhen
संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहिजण अतिक्रोधें ॥१॥ आज्ञा होतांचि चालिले मेघ । पवन त्याही पुढें सवेग । तेणें अभ्रें दाटली अनेक । पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥
sahaj gelo pandharapura | vishvambhara bhetisi
सहज गेलो पंढरपुरा । विश्वंभरा भेटीसी ॥१॥ तो हा उभा विटेवरी । देखिला श्रीहरी जगदात्मा ॥२॥
sahajachi gharinhuniyan yaven | vithathala pahaven rukmini
सहजचि घरींहूनियां यावें । विठठला पहावें रुक्मिणी ॥१॥ न लभेचि जो कां ब्रम्हादिकां । तो या लोकां दाखविला ॥२॥
sahajachi tumachin vandili paulen | tavan mi majhen hen hironi ghetalen
सहजचि तुमचीं वंदिली पाऊलें । तवं मी माझें हें हिरोनि घेतलें ॥१॥ आतां कोण दर्शना येईल सांगा । स्वभाव कळल्यावरी तुमचा पांडुरंगा ॥२॥
sahajachi nam alen vache | karit doshanche nirmul
सहजचि नाम आलें वाचे । करीत दोशांचे निर्मूळ ॥१॥ ऐशी व्यास गर्जे वाणी । महिमा पुराणीं विख्यात ॥२॥
sahajachi hoton ubha | sant sevechiya lobha
सहजचि होतों उभा । संत सेवेचिया लोभा ॥१॥ तंव काढिला निक्षेप । हातीं दिला तो अमूप ॥२॥
sangatan atan na vate kharen | bhogitan baren janavel
सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां बरें जाणवेल ॥१॥ तेव्हां कोणी न ये कामा । हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥
sangatan mahima pandharicha | apar vacha vedanchiye
सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥१॥ सहजचि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायुज्यता सामोरी ॥२॥
sangati ek kariti ek | joditi patak durbudhdi
सांगती एक करिती एक । जोडिती पातक दुर्बुध्दी ॥१॥ हिताहित न विचारिती । दुर्भरा भरिती महापापें ॥२॥
sangaton he manin dhara | hit kara apulen
सांगतों हे मनीं धरा । हित करा आपुलें ॥१॥ जा रे पंढरीसी आधीं कृपानिधीं भेटेल ॥२॥
sangaven ugauni na kale tayasi | tumhi to manasin saksha majhen
सांगावें उगउनी न कळे तयासी । तुम्ही तो मानसीं साक्ष माझें ॥१॥ विश्वाचे व्यापक चाळक चित्ताचें । साक्षी अंतरींचें जेथें तेथें ॥२॥
sangitali dhariti gothi | adar potin bhaktancha
सांगितली धरिती गोठी । आदर पोटीं भक्तांचा ॥१॥ तया सन्मुख झाला हरी । संसार तमारी तिमाराचा ॥२॥
sangitalen varma evadhenchi karin | nityata uchcharin harichen nam
सांगितलें वर्म एवढेंचि करीं । नित्यता उच्चारीं हरिचें नाम ॥१॥ न लगे कोटें जाणें येणें । कर्मबंधनें तुटतील ॥२॥
sangitalen santajani | ugavuni kanin bijaksharen
सांगितलें संतजनी । उगवुनी कानीं बिजाक्षरें ॥१॥ विठ्ठल जपतां विठ्ठल होसी । न धरीं मानसीं संशय ॥२॥
sangen ten hit dhara avaghen manin | naka man koni vit yacha
सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा ॥१॥ बरें शिकवितां बरें तें माना वाईटा त्यागावें त्यागवितां ॥२॥
sangel khun pari hen na kale | nughadatan dole budhdiche
सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥ याचिलागीं चित्तशुध्दी । करा हो उपाधी निरसुनी ॥२॥