भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें

sarvi asatan sarvapanen | mi hen mhane avidaya gunen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥ पाहातां आधीं अविदया‍चि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥ मीहि नाहीं तूंहि नाहीं । येकीं येकत्व नुपसें पाही ॥३॥ निळा म्हणे नहोनी कांहीं । नसोन असे आपुला ठांई ॥४॥