भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं

sarvammaji gagan ahe | pari dharitanchi naye kay karun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥ तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥ सागरीं पडतांचि लवणकण । निवडितां भिन्न न निवडे ॥३॥ निळा म्हणे तैशा परी । बोलतांचि वैखरी लीन तेथें ॥४॥