भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगती एक करिती एक । जोडिती पातक दुर्बुध्दी

sangati ek kariti ek | joditi patak durbudhdi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगती एक करिती एक । जोडिती पातक दुर्बुध्दी ॥१॥ हिताहित न विचारिती । दुर्भरा भरिती महापापें ॥२॥ यमप्रहार होती पुढें । नेणोनि मूढें वर्तती ॥३॥ निळा म्हणे अंगा येईल । तेव्हां जाणवेल भोगितां ॥४॥