भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा

sangen ten hit dhara avaghen manin | naka man koni vit yacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा ॥१॥ बरें शिकवितां बरें तें माना वाईटा त्यागावें त्यागवितां ॥२॥ पुढें सुख विश्रांती मागें राहे कीर्ति । ऐशिया पध्दति संतांचिया ॥३॥ निळा म्हणे देवें बोलविले बोल । ध्याल ते ते व्हाल सुखी तुम्ही ॥४॥