भजनी मालिका
← भजनांकडे परत

संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहिजण अतिक्रोधें

sanvartak varshel jaladharin | tuvanhi jhagataven tanv tyavari aisen sangoniyan prerile vari | panchahijan atikrodhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहिजण अतिक्रोधें ॥१॥ आज्ञा होतांचि चालिले मेघ । पवन त्याही पुढें सवेग । तेणें अभ्रें दाटली अनेक । पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥ विजुवा चमकती लक्षवरीं । कलपांत काळींच्या जैशा हारी । देखोनियां गजबज भारी । झाली गोकुलीं सर्व जनां ॥३॥ म्हणती कालिचि याची इंद्रपुजे । विश्रवंसिलें या नंदात्मजें । तेणेचिं क्षोभोलियां सहस्त्रांबुजे । मेघ धाडिले गर्जती ॥४॥ आतां जावें कोणीकडे । पळोनियां देवक्षोभापुढें । अकस्मात अरिष्ट हें एवढें । आणिलें कृष्णें आम्हांवरी ॥५॥ मागिल्या अरिष्टांत वांचला । तेणेंचि बहूत वेळ घेतला । घात आमुचा येणें केला । गाईगोवळा समवेत ॥६॥ तंव सुटला झुंजात वारा । मेघें घातल्या सरळ धारा । निळा म्हणे नंदकुमरा । करणें त्याचा अवमान ॥७॥