भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये

sangatan mahima pandharicha | apar vacha vedanchiye

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥१॥ सहजचि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायुज्यता सामोरी ॥२॥ विठ्ठल राज देखतां दिठी । वास वैकंठी तेचि क्षणीं ॥३॥ निळा म्हणे आलिगंन । देतां समाधान जिवशिवा ॥४॥