भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाचि उपाव सुगम सार । तरणें संसार जया नरा

hachi upav sugam sar | taranen sansar jaya nara

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हाचि उपाव सुगम सार । तरणें संसार जया नरा ॥१॥ नाम गातां गोविंदाचे । फिटे जीवाचें जीवपण ॥२॥ भुक्ति मुक्ति वोळंगे येती । अंगींचि ठाकती दया क्षमा ॥३॥ निळा म्हणे अवघीच सुखें । येती हिरखें चोजवित ॥४॥