भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाकेसवें उडी । घालूनियां स्तंभ फोडी

hakesaven udi | ghaluniyan stambh phodi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हाकेसवें उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥२॥ करितां आठव । धावोनियां घालि कव ॥३॥ निळा म्हणे गातां । नामें दयावी सायुज्यता ॥४॥