भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें

ha ton tumacha sahaj gun | karaven palan dasachen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें ॥१॥ नेणपणें म्यां विनविलें । पाहिजे क्षमा केलें तें ॥२॥ धीर नाहीं माझे मनीं । केली हमणोनि विज्ञान ॥३॥ निळा म्हणे रमावरा । क्षमा करीं अपराध ॥४॥