भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा केली संतजनीं । अर्थ दाविले उघडुनि

krupa keli santajanin | artha davile ughaduni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृपा केली संतजनीं । अर्थ दाविले उघडुनि ॥१॥ तेचि प्रगट केलें आतां । नाहीं बोलिलों मी स्वतां ॥२॥ नेणों काय केलें संतीं । माझी चेतवुनियां मती ॥३॥ निळा म्हणे वोढावारा । नाहीं तोंडा ना अक्षरा ॥४॥