भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

ऐसें एकोनियां यशोदा । म्हणे तरी मी न सोडी तूंते कदा । अंतरलें काम माझा धंदा । राहें गोविंदा ऐसाचि ॥१॥ बोलोनियां तें ऐसें गेली । आपुल्या कामा वरीपडि झाली । पुढें कृष्णे युक्ति केली । अति विचित्र ते ऐका ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदर धीर तुम्ही ॥१॥ तुमच्याचि काजा रुपासि येणें । मजलागीं धरणें अवतार ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें केशियाचें हनन । केलें देखोनियां सकळ जन गोकुळीचें विस्मयपत्र म्हणती न कळे महिमान श्रीहरिचें ॥१॥ कृत्रिम वेषिया तुरंगम । आला इच्छूनियां सग्राम । कैसा जाणूनियां मेघ:शाम । तयावरी सरसावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें जाणोनियां श्रीहरि । पालखी निजविल्या रुदन करी । न राहे अंकीही क्षणभरी । निवितां शेजारी तैसाची ॥१॥ काय करुं गे यशोदा म्हणे । कां हे करितीहे रुदनें । दिठावलें माझें तान्हें । निंबलोण उतरी तया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्ष होऊनियां निर्भर । नंदयशोदेचें वारंवार वर्णिती भाग्य निजमुर्खे ॥१॥ न संपडे जो योगसाधने । नाना तपें वेदाध्ययने । तो हा सगुणरुपें नारायण । क्रिडा करी याच्या घरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे बैसला रथावरी । भोंवते गोवळ चालती फेरी । हें देखोनियां नगर नारी । अत्यंत प्राण विकल त्यांचे ॥१॥ आतां कृष्णा येसील केव्हां । भेटसील प्राण शितळ तेव्हां । आठव आमुचाहि धरावा । तेथें पाहुणेरी गुंततां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें बोलोनियां ते उन्मत । ठोक फोडिले सक्रोधयुक्त । आले सन्मुखचि धांवत । कृष्णबळिरामेंसी झगटावया ॥१॥ त्यां देखोनियां बळिराम । आणि हासोनी बोलती मेघ:श्याम । तुम्ही करुं आलेती संग्राम । तरी निरऊनियां स्त्रियां बाळां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे याचे अकळ खेळ । जाणतां पांगुळ वेदश्रुती ॥१॥ काय फोडुनि चांदिण्या केल्या । गगनीं बांधल्या कीं मुक्त ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें वासुनी मुख अमूप । अघासुर पसरलासे सर्प । गाई गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥ पुढे चालतां मार्ग न दिसे । अंध:कारी पडिलें ऐसें । मागे फिरावें तंव तो श्वासें । ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें विचारुनियां मनीं म्हणे सौगडियां सारंगपाणी । बैल चांगला दिसतो नयनीं । परी धारुं कैसा देईल ॥१॥ तुम्ही व्हारे पैलीकडे । दुरी परते वेंघोनि हुडे । चौताळातां हा चहूंकडे । करील रगडा सकळांचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हां सारंगपाणी । कंसे ऐकानिया श्रवणी । परम खेद मानिजे ॥१॥ कृष्णजवळी होती मुलें । तिहीं तें आश्चर्य देखिलें । वडिलां सांगती नवल झालें । कृष्णासान्निध तंव ते । तेणें अति लाववें कवतुकें । भूमीसी आपटूनि मारिलें ॥३॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें सांगतां माभळभटा । राया दचक बैसला मोठा । मग पाचारुनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले ॥१॥ म्हणे वाढविलेंती बहुता मानें । अपार संपदा देऊनियां धनें । आजि माझिया उपेगा येणे । बाळ कृष्ण्‍ वधणें भलत्यापरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले । हरीचि होउनी ठेले एकाएकीं ॥१॥ आप पर तया न दिसेचि पाहतां । विश्वीं एकात्मता अवलोकीती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपें ॥१॥ त्याचिये कृपेचें अदभुत सामर्थ्य । दावी सिध्दपंथ चालावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कथाश्रवणें उपजे विरक्ति । कथाश्रवणें वाढे शांति । कथाश्रवणें परमानंद प्रप्ति । कथा श्रवणें ॥१॥ पापी उध्दरती । कथा श्रवणें उपाधी तुटे । कथाश्रवणें भवाब्धि आटे । कथाश्रवणें सच्चिदानंद भेटे । समुळ तुटे मायाजाळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कथाश्रवणें विरक्ति जोडे । निजशांती वाढे उल्हासें ॥१॥ कथाश्रवणें परमानंद । प्रगटे स्वानंद निज ह्रदयीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा