भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदर धीर तुम्ही

aisen aikoniyan uttar | dev mhane udar dhir tumhi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदर धीर तुम्ही ॥१॥ तुमच्याचि काजा रुपासि येणें । मजलागीं धरणें अवतार ॥२॥ तुम्ही माझें मी तुमचा । आहेचि ठायींचा ऋणनुबंध ॥३॥ निळा म्हणे देवभक्तां । ऐसी एकात्मका हो सरली ॥४॥