भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले । हरीचि होउनी ठेले एकाएकीं

aise hariche das harinamin rangale | harichi houni thele ekaekin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले । हरीचि होउनी ठेले एकाएकीं ॥१॥ आप पर तया न दिसेचि पाहतां । विश्वीं एकात्मता अवलोकीती ॥२॥ काम क्रोध लोभ मोह ममता माया । पळताती देखोनियां आशा तृष्णा ॥३॥ निळा म्हणे त्यांच्या दर्शनेंचि मुक्त । होताती पतीत महापापी ॥४॥