भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे बैसला रथावरी । भोंवते गोवळ चालती फेरी । हें देखोनियां नगर नारी । अत्यंत प्राण विकल त्यांचे

aise baisala rathavari | bhonvate goval chalati pheri | hen dekhoniyan nagar nari | atyant pran vikal tyanche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसे बैसला रथावरी । भोंवते गोवळ चालती फेरी । हें देखोनियां नगर नारी । अत्यंत प्राण विकल त्यांचे ॥१॥ आतां कृष्णा येसील केव्हां । भेटसील प्राण शितळ तेव्हां । आठव आमुचाहि धरावा । तेथें पाहुणेरी गुंततां ॥२॥ ऐकोनियां त्यांचीं वचनें संतोशीजे उभयतां मनें । मग त्या देउनी आश्वास नें । आज्ञा करिती ते अक्रूरा ॥३॥ आतां रथ चालवीं वेगीं विलंब नव्हे ऐसा मार्गी । माता पिता गौळणी लागीं । रहाविलें अत्यादरें ॥४॥ मार्गी चालतां परम संतोषी । करिती संवाद येरेयेरांसी । म्हणती धरिलिया अवतारासी । आजि झालें सार्थक ॥५॥ होतां मामासवें भेटी । पडेल जिवें जीवा गांठी । परमानंद होईल सृष्टी । दृष्ट कंटक निमालिया ॥६॥ निळा म्हणे ऐसिया लाभा । उभयतां‍हि अंगीं शौर्यशोभा । दाटली तेणें ऐश्रवर्य शोभा । जातासे हें अक्रूरा जाणवलें ॥७॥