भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हां सारंगपाणी । कंसे ऐकानिया श्रवणी । परम खेद मानिजे

aise vairiya muktidanin | krupavant han sarangapani | kanse aikaniya shravani | param khed manije

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसे वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हां सारंगपाणी । कंसे ऐकानिया श्रवणी । परम खेद मानिजे ॥१॥ कृष्णजवळी होती मुलें । तिहीं तें आश्चर्य देखिलें । वडिलां सांगती नवल झालें । कृष्णासान्निध तंव ते । तेणें अति लाववें कवतुकें । भूमीसी आपटूनि मारिलें ॥३॥ त्यांची शरीरें पर्वतराशी । पडिल्या आहेत गांवापाशीं । चला दाखवितों तुम्हासीं । म्हणवूनि सकळिकांसी हाकारिलें ॥४॥ तिहीं ते देखोनियां दिठी । भयें कांपती आपुल्या पोटीं । म्हणती अतुर्बळी हा जगजेठी । लेंकरुं कैसा म्हणावा ॥५॥ नंदहि विस्मयापत्र चितीं । म्हणे हे कोठूनि असूर येती । याचिया हाते पावेनि शांती । जाताती मुक्तिपदातें ॥६॥ निळा म्हणे गांवींचे लोक । करिती अवघेंचि कौतुक । परी कंसा अधिकाधिक् । क्षतें उमळती दु:खाची ॥७॥