भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें एकोनियां यशोदा । म्हणे तरी मी न सोडी तूंते कदा । अंतरलें काम माझा धंदा । राहें गोविंदा ऐसाचि

aisen ekoniyan yashoda | mhane tari mi na sodi tunte kada | antaralen kam majha dhanda | rahen govinda aisachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें एकोनियां यशोदा । म्हणे तरी मी न सोडी तूंते कदा । अंतरलें काम माझा धंदा । राहें गोविंदा ऐसाचि ॥१॥ बोलोनियां तें ऐसें गेली । आपुल्या कामा वरीपडि झाली । पुढें कृष्णे युक्ति केली । अति विचित्र ते ऐका ॥२॥ मग त्या उपडुनियां उखळा । आला बाहेरीं तया वेळा । दावें तैसेंचि असतां गळा । उखळ आडकवी वृक्षेसी ॥३॥ विमलारर्जुन कुबेरनंदन । नारदवचनें शाप पावेन । होते राहिले वृक्ष होऊन । कृष्णचरणस्पशें उध्दरावया ॥४॥ त्याचें उदित झालें भाग्य । यालागीं येऊनियां श्रीरंग । करिते झाले तो प्रयोग । सावध मनें परियेसा ॥५॥ ते उभयतांहि शेजारीं । वाढले होते दिव्य सहस्त्रवर्षेंवरी । उंची पाहातां गगनोदरीं । शाखपल्लव डोलती ॥६॥ त्या उभयतां माजी उखळ । आडकवुनी कृष्ण् गोपाळ । तया नेटी देउनी चरणतळ । हेलावा देऊनि उपटिलें ॥७॥ तिहीं गर्जना केली कैसी । प्रळयकाळींची विदयुल्लता जैसी । उध्दार पावेनियां हरिचरणासी । वंदूनियां ते गेले ॥८॥ ऐकोनियां तो घोषगजर । यशोदा धंवली अति सत्वर । पाहे तंव तो सारंगधर । माजि वृक्षा पडियला ॥९॥ मग उचलूनियां करतळीं । आलंगिला हदयमेळीं । निढळ मेळउनी निढळीं । अवलोकीं वदन क्षणक्षणा ॥१०॥ म्हणे भ्यालिसी गे माझी माय । थोर केला म्यां अन्याय । उखळीं बांधलीसी हा अपाय । थोर वरुनि चूकला ॥११॥ मग सोडूनियां कंठीचें दावें । मुख पुसी निजपल्लवें । निळा म्हणे याचीं लाघवें । नेणवतीचि ब्रम्हादिकां ॥१२॥