भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें विचारुनियां मनीं म्हणे सौगडियां सारंगपाणी । बैल चांगला दिसतो नयनीं । परी धारुं कैसा देईल

aisen vicharuniyan manin mhane saugadiyan sarangapani | bail changala disato nayanin | pari dharun kaisa deil

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें विचारुनियां मनीं म्हणे सौगडियां सारंगपाणी । बैल चांगला दिसतो नयनीं । परी धारुं कैसा देईल ॥१॥ तुम्ही व्हारे पैलीकडे । दुरी परते वेंघोनि हुडे । चौताळातां हा चहूंकडे । करील रगडा सकळांचा ॥२॥ ते म्हणती बरें कृश्णा । परी तूं सांभाळीं हो आपणा । ऐसें म्हणोनियां पळती राणा । गिरींशिखरीं बैसले ॥३॥ मग कास घालूनि गोपीनाथ । चालिला पुढें चुचकारित । तंव तो म्हणे आजी कार्यार्थ । बरा साधला एकांती ॥४॥ जवळी यावयाची वाट पाहे । उगाचि स्तब्ध उभा राहे । हें जाणोनियां यादवराव । अंग राखोनि चमकतु ॥५॥ ऐसा आटोपिला हरी । तंव ते मायावी आसुरी । धंविान्न्ला तयावरी । शिंगे पसरुनि विस्तीर्णें ॥६॥ निळा म्हणे फुंपात उठी । चौताळ लागे पाठीं । तंव हा परमात्मा जगजेठी । गांठी पडों नेदीचि ॥७॥