भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे याचे अकळ खेळ । जाणतां पांगुळ वेदश्रुती

aise yache akal khel | janatan pangul vedashruti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसे याचे अकळ खेळ । जाणतां पांगुळ वेदश्रुती ॥१॥ काय फोडुनि चांदिण्या केल्या । गगनीं बांधल्या कीं मुक्त ॥२॥ कासयाचे पर्वत धोंडे । घडिले अपाडे अमर्याद ॥३॥ निळा म्हणे पर्जन्यधारा । केल्या अपारा त्या कैशा ॥४॥