भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांही चमत्कार देखती । विश्वासें तरी वाटे प्रीति

kanhi chamatkar dekhati | vishvasen tari vate priti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कांही चमत्कार देखती । विश्वासें तरी वाटे प्रीति ॥१॥ ऐसा विपरीत आहे भोळा । जाणा येथींचा जी गोपाळा ॥२॥ येहवीं कोणी फुकासाठीं । नाम नुच्चारिती ओठीं ॥३॥ निळा म्हणे नारायणा । म्हणोनि दाविली सूचना ॥४॥