भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें ॥१॥ म्हणोनियां वारंवार । त्याचे उपकार आठवितों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृपाळु भक्तांचा कैवारी । क्रोध दैत्यांदानवांवरी । एका तारी एका मारी । एका उध्दरी नाममात्रें ॥१॥ एका घरीं एका दारीं । एका ह्रदयीं एका परिवरी । एका धुंडितां अष्टही प्रहरीं । न सांपडे माझारी त्रैलोक्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्ण परमात्मा श्रीहरी । बळिराम शेषअवतार निर्धारी । कैसे शोभले अलंकारीं । निजांगाचियें निज प्रभे ॥१॥ मुगुट कुंडले विशाळ डोळे । जैसी विकासलीं सूर्यकमळें । अंगकांती रुप सांवळें । पीतांबराची परिधानें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्ण बळराम उठिले । मुखमार्जनें सारिलें । तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठी ॥१॥ गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते । मग आणूनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्नताटें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्ण बळियामाजि बलिष्ट । कृष्ण अवघियां देवां श्रेष्ठ । तैसाचि बळिरामही उध्दट । भरील घोट देखतां ॥१॥ एक नवनागसहस्त्रबळीं । दुजा तंव ते कल्पांत शुळी । येतांचि येथें निमिष मेळीं । करितील संहार कंसाचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्णबळिरामातें म्हणती । गोवळे तुम्हीं अर्भक जाती । मारिला म्हणोनी कुळवई हस्तीं । तेणेंचि स्फुंदेस्फुंदूं नका ॥१॥ बहुत दिवस खादलें लोंणी । चोरिये वोसिली दुधाणी । सिंतरुनियां भोगिल्या गौळणी । त्याचीही झाडती निघेल । ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्णरुपा वेधिल्या नारी । देखती अंतरी तेंचि रुप ॥१॥ गमनीं शयनीं आसनी भोजनीं । देखती जनीं वनीं दृष्टीपुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिली बंधनें बहुतांची ॥१॥ जिही उच्चारिलें अनुतापें नाम । त्यांचे जन्ममरण निवारिलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

केव्हां भेटी देसी जिवाच्या जीवना । सुखाच्या निधाना पांडुरंगा ॥१॥ वोरसलें मन नित्य वाट पाहे । नयनीं नीज नये दिवसरात्रीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा