भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें

krupaghanen vrushti keli | majhin nivavilin nijangen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें ॥१॥ म्हणोनियां वारंवार । त्याचे उपकार आठवितों ॥२॥ न घेउनी कांही सेवा । धांविले कुणवा आपुलिया ॥३॥ निळा म्हणे सुखी केलें । हातीं धरिलें वरदानें ॥४॥