भजनी मालिका
← भजनांकडे परत

केले सुखी फार । कांही न करिता विचार

kele sukhi phar | kanhi na karita vichar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
केले सुखी फार । कांही न करिता विचार ॥१॥ कोण याती कैसें कुळ । नामें आळवितां कृपाळ ॥२॥ केले वरिष्ठ सकळा । प्रेमे देऊनियां गळां ॥३॥ निळा म्हणे वाढविले । वैकुंठीं ते सरते केले ॥४॥