भजनी मालिका
← भजनांकडे परत

केली कीर्ति अलोलिक । फुटली हाक त्रैलोक्यीं

keli kirti alolik | phutali hak trailokyin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
केली कीर्ति अलोलिक । फुटली हाक त्रैलोक्यीं ॥१॥ दोषी दुराचारी जन । केले पावन दर्शनें ॥२॥ नामासाठीं मुक्ती फुका । हाही नेटका बडिवार ॥३॥ निळा म्हणे यात्रेसी येती । ते ते हाती कृतार्थ ॥४॥