भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण परमात्मा श्रीहरी । बळिराम शेषअवतार निर्धारी । कैसे शोभले अलंकारीं । निजांगाचियें निज प्रभे

krushna paramatma shrihari | baliram sheshaavatar nirdhari | kaise shobhale alankarin | nijangachiyen nij prabhe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृष्ण परमात्मा श्रीहरी । बळिराम शेषअवतार निर्धारी । कैसे शोभले अलंकारीं । निजांगाचियें निज प्रभे ॥१॥ मुगुट कुंडले विशाळ डोळे । जैसी विकासलीं सूर्यकमळें । अंगकांती रुप सांवळें । पीतांबराची परिधानें ॥२॥ कंठी पदकें सुमनकळा । कौस्तुभ एकावळी रुळती गळां । बाहुभूषणें मुद्रिका सकळां । कांडोवाडी सुशोभित ॥३॥ सुकुमार नागर अंगकांती । ज्याचिया तेजें रविशशी दीप्ती । हुताशनीं रत्नीं प्रकाशे फांकती । ज्याचेनियां झगमगती तारांगणे ॥४॥ सुवर्ण म्हणती जें उत्तम । तें याचिये अंगकांती सुमहिम । ऐसे सौंदर्य निरुपम । कृष्णाकृती वोसंडलें ॥५॥ जैसिया परी तैसा भासे । हेंहि अपूर्वचि एक असे । कृष्णरुपें लाविलें पिसें । न स्मरती पहातां देहगेहा ॥६॥ निळा म्हणे बैसली दृष्टी । कृष्णारुपीं ते सहसा नुठी नरनारी विस्मित पोटीं । अवलोकिती श्रीकृष्णा ॥७॥