भजनी मालिका
← भजनांकडे परत

केव्हां भेटी देसी जिवाच्या जीवना । सुखाच्या निधाना पांडुरंगा

kevhan bheti desi jivachya jivana | sukhachya nidhana panduranga

रचनाकार: संत निळोबा · अभंग
केव्हां भेटी देसी जिवाच्या जीवना । सुखाच्या निधाना पांडुरंगा ॥१॥ वोरसलें मन नित्य वाट पाहे । नयनीं नीज नये दिवसरात्रीं ॥२॥ आला जातो दिवस मास घटिका पळ । प्राण हा विव्हळ तुजलागीं ॥३॥ हुरहुरी चित्त सदा उत्कंठित । न पुरोचि हा हेत चितां वाटे ॥४॥ केव्हा येईल सार्थकाची वेळ । येसी कृपाळ धांवोनियां ॥५॥ निळा म्हणे आतां न लावावा उशीर । भेटोनी अंतर निववारें ॥६॥