भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला माझा अंगिकार । ठेविले कर जेणें कटीं

kela majha angikar | thevile kar jenen katin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
केला माझा अंगिकार । ठेविले कर जेणें कटीं ॥१॥ आतां सुखा नाहीं उणें । नामस्मरणें याचिया ॥२॥ तीर्थे व्रतें तपोवनें । वसती स्थानें भासती ॥३॥ निळा म्हणे साधनसिध्दि । दर्शनें उपाधी निरसिल्या ॥४॥