भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळयासर्प गजेंद्रनाग । जटायु पतंग उध्दरिला

kalayasarpa gajendranag | jatayu patang udhdarila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काळयासर्प गजेंद्रनाग । जटायु पतंग उध्दरिला ॥१॥ कुब्जादासी गणिका वेश्या । व्याधहि मांसाहारि तो ॥२॥ भिल्ल पापी अजामेळ दोषी । पूतना राक्षसी उध्दरिली ॥३॥ निळा म्हणे तुमचा ऐसा । कीर्तिचा ठसा तिहीं लोकीं ॥४॥