भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करुं वो भुलविलें भुलीं । चित्त माझें या विषयाचे चाली । आड कल्पना ठोकोनि राहिली । त्याणें संगती वो याची अंतरली वो

kay karun vo bhulavilen bhulin | chitta majhen ya vishayache chali | ad kalpana thokoni rahili | tyanen sangati vo yachi antarali vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काय करुं वो भुलविलें भुलीं । चित्त माझें या विषयाचे चाली । आड कल्पना ठोकोनि राहिली । त्याणें संगती वो याची अंतरली वो ॥१॥ पायां पडतें वो दाखवा मज वाट कर्माकर्मा चुकूनियां घाट । कामक्रोधाचें ऐकोनि बोभाट । भय वाटे तें हें देखोनि दुर्घट वो ॥२॥ मज तो विचार न सुचे आपुल्या मतें । न्याल तुम्ही त्या येईन सुपंथें । घेउनी धर्म मज पाववा वो तेथें । जेथें असती सांवळे गोपिनाथ वो ॥३॥ कोठें गेले या करुं वोरबारा । आगी लागो या अघोरा संसारा । पडते गुंति हा अधिक्ची पसारा । भेटवा आतां मज न्यावो सारंगधरा वो ॥४॥ येथें होती हे बहुतचि उत्पात । जन्म जरा या व्याधींचे आघात । भुलले वाट वो न मिळतां संघात । तुम्ही पाववा वो रमानाथ जेथें वो ॥५॥ आहे भरवसा हा तुमचाचि मज । संत जाणतसां अंतरींचें गुज । आले शरण ते पावविता सहज । निळा म्हणे आतां राखा माझी लाज वो ॥६॥