भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्होबाचें चाटुनियां आंग । म्हणती मग पोट धालें

kanhobachen chatuniyan ang | mhanati mag pot dhalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कान्होबाचें चाटुनियां आंग । म्हणती मग पोट धालें ॥१॥ रोज ऐसिची देंई धणी । लागती चरणीं गोपाळ ॥२॥ म्हणती गोविंद मोठे व्हाल । मग तुम्हीं जाणें सांडाल सोंय माझी ॥३॥ निळा म्हणे ते वाहती आण । नेणों सुजाण तुजविण ॥४॥