भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करावी तपसाधनें । हरिनाम चिंतनें सर्व सिध्दी

kay karavi tapasadhanen | harinam chintanen sarva sidhdi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काय करावी तपसाधनें । हरिनाम चिंतनें सर्व सिध्दी ॥१॥ हा गे वाल्‍मीक रामचि झाला । प्रल्हादें जिंकीला व्दंव्दसमूह ॥२॥ गजेंद्र पशू नामचि जपतां । मुक्ति सायुज्यता भोग भोगी ॥३॥ निळा म्हणे हरिनाम वाड । मुक्तिचें सांकड नाहीं आम्हां ॥४॥