भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

गोवळ देती उष्टावळी । म्हणती गोड हें वनमाळी । घालूनियां श्रीमुख त्या कमळीं । परम संतोषें स्वीकारी ॥१॥ आवडीचें तेचि तें गोड । भाव देखे ज्याचा वाड । त्याचेचि घे येरा निचाड । दांभिका अभिमानायाचें वोसंडी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोवळसंगे चोरिया करी । शिंकी उतरुनियां बाहेरी । आणि फोडी गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे ॥१॥ दूध तूप साय लोणी । दहीं हुडकूनियां आणी । खाय लवंडी आणि पोरा लागुनी । देऊनियां धणी सुखी करी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या अकस्मात । पडणपात त्या झाला ॥१॥ मग ते आले पायवाटा । पाहाती गाई तंव सुभटा । वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचिया सुकाळा । केले वत्सां आणि गोळियां ॥३॥

रचनाकार: संत निळोबा

घन:श्याम मूर्ति राजीवलोचन । सांठवलें त्रिभुवन उदरामाजी ॥१॥ कौस्तुभ पदकें तुळसीमाळा कंठी । कास हे गोमटी पीतांबरें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घरीं आपुलिया मातेपाशीं । देखोनियां मागें शशी । म्हणे देंईवा खेळावयासी । आणूनी तो मज हातीं ॥१॥ येरी म्हणे परिसे ताता । गगनींचा तो नये हाता । नको छळूं रे कृष्णनाथा । नाहीं तेंचि मागों नको ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घरोघरी हेचि कथा । येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली‍ थोंर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥ नवलचि तें ऐकता परी कैसी शोशिली निमिशावरी । सांगती दासी त्या परिचारी । ऐका अपूर्व हे कथा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घांट गर्जे महाव्दारीं । विठ्ठल नामें वागेश्वरीं ॥१॥ निळा उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घालितां उमाणीं पोरा नुमजति तुज । उकलूनियां हरि घेई हदईचें निज ॥१॥ असोनियां चराचरीं न दिसे तें काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चढोनियां झाडा पोरा खेळसी सुरकांडी । निसरतां हात पाय माझा होईल मोडी ॥१॥ धरुनी हरि चित्तिसी खेळे वरिझाडा । अभिमानें जासी तरी होईल चुरा हाडा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा