भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपीवल्लभा कमलाकान्ता । अनाथनाथा श्रीविठठला

gopivallabha kamalakanta | anathanatha shrivithathala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोपीवल्लभा कमलाकान्ता । अनाथनाथा श्रीविठठला ॥१॥ तुमचा दास झालों आतां । करा जी सरता पायापें ॥२॥ गाऊनियां नामावळी । नाचेन टाळी वाजवित ॥३॥ निळा म्हणे घ्याल सेवा । पात्र दैवा तैं झालों ॥४॥