भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरोघरी हेचि कथा । येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली‍ थोंर चिंता । पूतनाबाई निमालिया

gharoghari hechi katha | yereyeran sangati varta mhanati rayasi padili‍ thonr chinta | putanabai nimaliya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घरोघरी हेचि कथा । येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली‍ थोंर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥ नवलचि तें ऐकता परी कैसी शोशिली निमिशावरी । सांगती दासी त्या परिचारी । ऐका अपूर्व हे कथा ॥२॥ म्हणती स्तना लावितांची वदन । शोषियलें जीव प्राण । पूतना रडे आक्रंदोन । म्हणे धांव धांव ओढीं यशोदे ॥३॥ ओढितां न सुटचि शोषिली । मुकतपंथचि ते लाविली । अवघी देखानियां तेथ भ्यालीं । सेवकें आली पळोनियां ॥४॥ येउनी रायतें जाणवलें । पूतनाबाईतें बोळविलें । बाळे शोषूनियां घेतलें । परम आश्रचर्य हें वाटे ॥५॥ राया घरी दु­:ख थोर । वाढलें झाला चिंतातूर । पुढे काय करील विचार । तें पाहावें नारीनर बोलती ॥६॥ निळा म्हणे यावरी आंता । अपूर्व आहे पुढील कथा । माभळभटासी गोकुळा जातां । होर्दल पूजा पिढीयांची ॥७॥