भजनी मालिका
← भजनांकडे परत

घन:श्याम मूर्ति राजीवलोचन । सांठवलें त्रिभुवन उदरामाजी

ghan:shyam murti rajivalochan | santhavalen tribhuvan udaramaji

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घन:श्याम मूर्ति राजीवलोचन । सांठवलें त्रिभुवन उदरामाजी ॥१॥ कौस्तुभ पदकें तुळसीमाळा कंठी । कास हे गोमटी पीतांबरें ॥२॥ लेईला अलंकार भूषणें परवडी । दिव्य रत्नें चोखडी । खवणें तयां ॥३॥ निळा म्हणे माझें निवालें तनुमन । देखतांचि सुप्रसन्न वदन याचें ॥४॥