भजनी मालिका
← भजनांकडे परत

चढोनियां झाडा पोरा खेळसी सुरकांडी । निसरतां हात पाय माझा होईल मोडी

chadhoniyan jhada pora khelasi surakandi | nisaratan hat pay majha hoil modi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चढोनियां झाडा पोरा खेळसी सुरकांडी । निसरतां हात पाय माझा होईल मोडी ॥१॥ धरुनी हरि चित्तिसी खेळे वरिझाडा । अभिमानें जासी तरी होईल चुरा हाडा ॥२॥ दिसती त्या खाधा पोरा मोठयापरी ठीसरी । मोडती आंगभारें याचा विश्वास न धरीं ॥३॥ निळा म्हणे सांगितलें धरि चित्तें मनें । मग तूं चढेवरी सुखें हिंडे खादयापानें ॥४॥