भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण तया लेखी । नाहीं विठठलीं ओळखी

kon taya lekhi | nahin vithathalin olakhi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोण तया लेखी । नाहीं विठठलीं ओळखी ॥१॥ करिती तितकें पोटासाठीं । गाणें नाचणें आटाआटी ॥२॥ कळा दाविती व्युत्पत्ति । चातुर्य जाणिवेची संपत्ती ॥३॥ निळा म्हणे संतापुढें । येतां लाजती ती माकडें ॥४॥