भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें

koti divalaya dasare san | ghadalen shricharan dekhilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥ सकळही पर्वेव्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥ आलिंगनें शीतळ काया । निवाल्या बाह्या जीव प्राण ॥३॥ निळा म्हणे अवघींच अंगें । तुमच्या संगे सुस्नात ॥४॥