भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसेनि आकळतें मन । देवावीण भक्तांचें

kaiseni akalaten man | devavin bhaktanchen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कैसेनि आकळतें मन । देवावीण भक्तांचें ॥१॥ कामक्रोधलोभा शांती । कैसेनि होती मग त्याची ॥२॥ काळदंड चुकविता । कोण होता देवावीण ॥३॥ निळा म्हणे मोकळा भक्ता । करुनि ठेविती कोण पदीं ॥४॥