भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी

kothenchi ha nase kothenhi na dise | kothenchi amukase na mhane koni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥ कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥ कोठें याची स्थिति कोठें याची प्रीति । कोठें याची वसती न कळे कोणा ॥३॥ कोठूनि याचें कूळ । वर्णावयास आढळ न कळे गोत्र ॥४॥ निळा म्हणे याती न दिसे रुपाकृती । नयेचि कोणे व्यक्ती विचार करितां ॥५॥